सन्मान नारीशक्तीचा उत्कृष्ठ महिला पत्रकार पूरस्कार
पत्रकार सौ .निलम खोसे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सामाजिक प्रश्नां बरोबरच महिलांच्या प्रश्नांवर लेखन करून ते प्रश्न प्रकाशात आणून त्या सोडविण्यास मदत करावी , अशी अपेक्षा अळकुटीच्या सरपंच डॉ कोमल भंडारी यांनी व्यक्त केली .
पत्रकार सौ .निलम सुरेश खोसे पाटील यांना नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा महिला दिनानिमित्ताने " सन्मान नारीशक्तीचा उत्कृष्ठ महिला पत्रकार " हा मानाचा पुरस्कार साई नगरी शिर्डी सरला पिठाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते , पद्मश्री पोपटराव पवार व पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ . विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवून गौरविण्यात आले . त्यानिमित्त अळकुटी येथे जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे सदस्य किसनराव शिंदे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार सौ .निलम खोसे पाटील यांचा शाल , श्रीफळ देवून आदर्श सरपंच डॉ कोमल भंडारी यांच्या हस्ते सन्मानानीत करण्यात आले . त्यावेळी सरपंच डॉ . भंडारी यांनी महिला पत्रकार सौ . निलम खोसे पाटील यांच्या बद्दल गौरवोउद्गार काढले .
तर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमा बद्दल अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे बोलताना म्हणाले की , पत्रकार खोसे पाटील परिवार अतिशय सुसंस्कृत असून पारनेर तालुक्यातील अनेक सामाजिक , शैक्षणिक, कृषी , रोजगार , राजकीय प्रश्नांवर केलेले लेखन वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजापुढे मांडून उजेडात आणल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली . पत्रकार सुरेश खोसे पाटील व सौ . निलम खोसे पाटील हे दाम्पत्य तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली एकमेव जोडी आहे , असे गौरवोद्गार ही जिल्हा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य शिंदे यांनी काढले .
सत्काराला उत्तर देताना पत्रकार सौ . निलम खोसे पाटील म्हणाल्या की , किसनभाऊ शिंदे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने माझा झालेला सन्मान माझ्या माहेरच्या माणसांनी केलेला सन्मान असून या सन्मानाने मी भारावून गेली असून , यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे .मी माझ्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन , अशी ग्वाहीही पत्रकार सौ . निलम खोसे पाटील यांनी याप्रसंगी दिली .
यावेळी पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचा ही मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला . पारनेर तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते अतुल माने , अळकुटी सेवा संस्थेचे संचालक सुभाषराव भोसले , महेंद्र शिरोळे , संतोष जाधव , प्रभू जाधव , शिवाजी जाधव , रामदास भंडारी , शशिकांत कनिग्ध्वंज, चंद्रकांत शिंदे , बापू म्हस्कुले , बन्सी जगताप , रविंद्र दवे , अनिल पुंडे , पत्रकार नितीन परंडवाल , मच्छिंद्र गलांडे , सखाराम भंडारी , अतुल माने , सविता जाधव , भक्ती शिरोळे , पुनम दवे , रेणुका शिंदे , वर्षा भोसले , रेश्मा गलांडे , कविता पुंडे , सुरेखा भंडारी , गितांजली शिंदे , आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा