कृषी शास्त्रज्ञ अनिल तारू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुक प्रतिनिधीआरिफ शेख
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात व त्याच पार्श्वभूमीवर विविध पिकांचे प्रकल्प तालुक्या मध्ये अनेक ठिकाणी कृषी विभागामार्फत राबविल्या जात आहे. सदर पिकांच्या भेटीसाठी आणि मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील कृषी शास्त्रज्ञ अनिल तारू यांनी किनगावराजाशिवारातील ज्वारी पिकाची पाहणी केली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले आहे. किनगाव राजा येथे ज्वारी पिकावर मार्गदर्शन करतांना चारू यांनी प्रामुख्याने ज्वारी पिकाचे उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, ज्वारी पिकाच्या नवीन संकरित जाती यावर माहिती दिली. तसेच पौष्टीक तृणधान्य आहे म्हणून ज्वारी पिकाचे आहारातील महत्त्व तसेच ज्वारी पिक पद्धती याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल तारू यांच्याकडूनकरण्यात आले.
शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन गट स्थापन करावेत व कृषिप्रक्रिया आधारित उद्योग चालू करावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री गोपाल बोरे यांनी केले तसेच कृषि विभागाच्या इतर योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास बुलढाणा कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू, तालुका कृषी अधिकारी गोपाल बोरे, तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन काळे, कृषि सहायक प्रणव वाघ, कृषि सहायक प्रविन बगाडे व किनगाव राजा येथिल सरपंच प्रकाश मुंढे, शेतकरी गजानन कासतोडे, राजू घिके, दूध उत्पादक रामा काकड शिवाजी साळवे आदी शेतकरी उपस्थीत होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा