मे महिन्या अखेरीस पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी, मजहर खाॅंन पठाण
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरातील पद्मावती येथील धरणात ५५% पाणी साठा उपलब्ध असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने दिवसेंदिवस घट होत असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. भोकरदन तालुक्यात काही गावात दुष्काळ स्थिती निर्माण झाली असल्याने अनेक गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊन विकतचे पाणी घ्यावे लागत आहे असे चित्र असताना मात्र पद्मावती येथील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु ऐन दुष्काळाच्या तोंडावर धरणातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्याकडून पिकाला पाणी दिले जात असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने मे अखेरीस पाणी साठा पुरेल एवढेच क्षमता धरणात असून परिसरातील २० गावांचा पिण्याच्या पाण्यासह मिटणार आहे.
तसेच रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांना तुषार सिंचन द्वारे पिकांना पाणी देण्याचा परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न असतो परंतु पाणी उपसा थांबल्यास आगामी काळातील पिण्याचा प्रश्न सुटू शकतो परंतु पाणी उपसा थांबवण्याची गरज आहे. तसेच धरणामुळे रब्बीला मोठा फायदा आहे. गेल्या सप्टेंबर- आक्टोंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने परिसरातील नदी ,नाले मोठ्या प्रमाणात दुधडी भरून वाहल्याने परिसरातील विहीर , नदीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होवून नाले ओसांडून वाहल्याने परिसरातील पद्मावती येथील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
तसेच मोठ्या शेत्रावर रब्बी पिकांची लागवड झालेली दिसून येत आहे . पद्मावती धरण हे भोकरदन तालुक्यातील मोठे विस्तारलेले सर्वांत मोठे धरण असून धरणातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा केला जातो. धरण हे जवळपास मोठ्या क्षेत्रावरील जमिनी वर विस्तारलेले असल्याने परिसरात पाणीच पाणी असून सर्व परिसरातील शिवार हिरवेगार आहे. धरणाची लांबी भिंतीपासून ३ कि.मी अंतरावर असून धरण हे पाण्याच्या पातळी ५० ते ६० फुट खोल असून धरणात १२ महिने कायमस्वरूपी मच्छिमार व्यवसायीक उत्पन्न घेतात . तसेच धरणाच्या परिसरात वालसावंगीसह , पारध, मासरूळ ,डोंगरूळ, धामणगाव , सुंदरवाडी, धावडा आदी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठली अडचण होणार नाही तसेच परिसरातील गावांना धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा आहे.
,धरणात सध्या ५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणीपुरवठा केला जातो व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांना पाण्यासाठी होत असलेला वापर थांबवा जेणेकरून उन्हाळ्यात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही.
- महावीर मुरकुटे अभियंता पद्मावती धरण.
फोटो ओळी: पद्मावती येथील धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा