पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध ठिकाणी नांगरे यांचा सत्कार करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार राम नागरे यांना देण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री अजीत पवार, महाराष्ट्र राज्य सचिव सुमंत भांगे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदाण करण्यात आला.
राम नागरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अंबेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, बेरुळा द्वारा संचलित नागेश्वर प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय औंढा (नागनाथ ) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सीता राम नागरे, उद्धव नागरे, प्रद्युम्न नागरे, प्राचार्य ज्ञानोबा लांडे, मुख्याध्यापक जयकुमार इंगोले, उपप्राचार्य जगताप विद्याधर, उप मुख्यध्यापक शेख सईद, गजानन तावरे, गजानन क-हाळे , रुखमाजी नवले, अंबादास वाव्हुळ , सचिन जाधव, प्रज्ञा वाघमारे , मंगल खरात, उज्ज्वला मानोरे, उर्मिला नागरे , आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा