निविदा न काढल्याने प्रशासनाच्या येणार अंगलट
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शासन आपले दारी कार्यक्रमात नागरिकांना ने आण करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ३०० बसेस दिमतीला ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी एसटी महामंडळाला भाड्याच्या देयका पोटी तब्बल ५९ .५८ लाख रुपयांचा निधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला लॉटरी लागली असून एका दिवसातच कमाई झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविल्याने अंगलट येणार आहे.
शासन आपले दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. यासाठी जिल्हा प्रशासनाने विकासकामांचा असलेल्या निधी
सरकारी कामात वापरून सरकारी अधिकाऱ्याकडून एकप्रकारे
जिल्हा नियोजनच्या निधीतून सुमारे अडीच कोटीचा निधी कार्यक्रमासाठी मंजूर केला. यामध्ये शामियाना मंडप , डोम, बँड बाजा ,खाजगी वाहने , सत्कार , लाभार्थीना लाभाचे वितरण साठी धनादेश आदी बाबींचा यात समावेश आहे. यासाठी देयके देण्यासाठी प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.
दरम्यान, नागरिकांना ने आणसाठी गावोगावी एसटी बसेस पाठविण्यात आल्या. परंतु मराठा समाजाच्या आक्रमक झालेल्या तरुणांनी गावात आलेल्या बसेस हात हलवीत रिकाम्याच पाठविल्याने प्रशासनाची दमछाक झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी चक्क अंगणवाडी, सेविका, बचत गट , आशा वर्कर ,शिक्षक यांना सांगण्यात आले. महायुतीचा कार्यक्रम असताना याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी यांनी चक्क पाठ फिरवली तर दोन्ही उपमुख्यमंत्री न आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम हायजॅक करून शिंदे सेनेचा असल्याचे दाखवून दिले.
एकंदरीत जिल्ह्याच्या निधीसाठी असलेल्या तिजोरीवर सरकारी अधिकाऱ्यानी जिल्हा नियोजनच्या निधीतून शासन आपल्या दारी कार्यक्रमात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून काय साध्य केले काही कळायला मार्ग नाही. यापूर्वी देखील जाणता राजा कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. मात्र पुरेसे नियोजन नसल्याने यापासून नागरिक वंचित तर राहिलेत ,दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाल्याने नागरिकांत चर्चेला उत आले होते. दरम्यान ,तीनशे बसेस साठी जिल्हा प्रशासनाकडून भाड्यापोटी एसटी महामंडळाला ५९.५८ लाखाचा निधी द्यावा लागणार आहे. एसटी महामंडळाचे आगार प्रमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे येऊन ५९.५८ लाखाची देयके सादर केली. म्हणजे सरकारी अधिकारी यांच्याकडून एका दिवसात एसटी महामंडळावर ८९.५८ लाख रुपयांचा खर्च केला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा