६४ हजाराचा वाळलेला गांजा जप्त , दोघांवर गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शहरात अवैध गांजा विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पकडले असुन त्याच्या कडून ६४ हजाराचा वाळलेला गांजा जप्त करत विक्री व पुरवठा करणारा अशा दोन आरोपीविरूदध गुन्हा दाखल करून एकास अटक केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक हिंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार बसस्थानक परीसरात राज पान शॉप येथे अवैधरित्या गांजा विक्री चालु आहे. अशी माहिती मिळाल्यावरून पथकाने पंचासह दुपारी ३.२५ च्या दरम्यान बसस्थानक परीसरातील राज पान शॉप येथे छापा टाकला असता तेथे पानपटटी चालक शेख अहेमद उर्फ अमर शेख दाउद रा. मस्तानशहानगर हिंगोली हा मिळुन आला.
पोलीस पथकाने त्यांच्या पानपटटीची झडती घेतली असता २.५६० कि.ग्रॅ. किमती ६४ हजार रुपयाचा वाळलेला गांजा मिळुन आला. तसेच सदरचा गांजा हा इसम नांदेड येथील ईसाक यांच्या कडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शेख अहेमद उर्फ अमर शेख दाउद रा. मस्तान शहानगर हिंगोली, ईसाक रा. नांदेड या दोघांविरूदध पोस्टे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाल सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार, पांडुरंग राठोड, पारू कुडमेथा, नितिन गोरे, अशोक धामणे, संभाजी लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे, धनंजय क्षिरसागर यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा