जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण महसूल व नगरपालिकेने काढले
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण महसूल व नगरपालिकेने काढले असून रस्त्याची कामे संथगतीने सुरू आहेत.
जलेश्वर तलाव परिसरातील महसूल व पालिकेने अतिक्रमण काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण काढल्याने तलाव परिसर मोकळा झाला आहे. या परिसरात रस्त्याची, पथदिवे, संरक्षण भिंत आदी कामे केली जाणार आहेत. रस्त्याच्या कामाचे मार्क आऊट टाकले, परंतु गुत्तेदाराकडून रस्त्याची कामे संथगतीने सुरू असल्याने कामाची गती थंडावली आहे. आता तर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका व महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे गुत्तेदार हा मनमानी कारभार करून कामे संथगतीने करीत आहे. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा