maharashtra day, workers day, shivshahi news,

पहिल्या दिवशी ४१ इच्छुकांकडून ११९ अर्ज घेतले

 हिंगोली लोकसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली
Notification of Hingoli Lok Sabha Election released today , Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली -  हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी आज पहिल्या दिवशी ४१ इच्छुक उमेदवारांनी ११९ नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी एकानेही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४१ इच्छुक उमेदवारांनी ११९ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे ४ एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. शनिवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राचे वितरण व स्वीकृती सुरु राहणार आहे. 
परंतु शुक्रवार, दि.२९ मार्च व रविवार, दि.३१ मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !