इस्टिमेट प्रमाणे व इंजिनियरच्या मार्गदर्शनाखालीच काम केले आहे -गुत्तेदार मनोज मोरे
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील रस्ते विकासासाठी करोडो रुपयांच्या निधी देण्यात आला कुंटूर ते राहेर असा 11 ते 17 किलोमीटर अंतर्गत होणाऱ्या डांबरीकरण मजबुतीकरण रस्त्याच्या कामावर पूल बनवणे व रस्ता बनवण्यासाठी 9 कोटी रुपयांच्यावर निधी देण्यात आला होता.सदर कामे हे मोरे कंट्रक्शन मनोज मोरे यांची गुत्तेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले .
मात्र काही ठिकाणी मर्जीप्रमाणे कामे तर काही ठिकाणी वरिष्ठाच्या आदेशानुसार कामे केले असल्याची माहिती खुद गुत्तेदार मनोज मोरे यांनी वृत्तपत्र प्रतिनिधि सी बोलताना सांगितले.
इंजिनीयर व जेई तसेच सार्वजनिक बांधकामा अभियंता व इस्टिमेट प्रमाणे कामे सुचवून कामे केले असून त्यांच्या मार्गदर्शनाने सदर कामे करण्यात आली आहे.
सदर आधी माहिती घेऊन इस्टिमेट पाहून बातमी लिहावी असे सूचक उत्तर वृत्त प्रतिनिधीला गुत्तेदार यांनी दिली आहे. त्यामुळे फुलाचे बांधकाम त्या इस्टिमेट मध्ये आहे का नाही हे पाहणे गरजेचे असून सदर पुलावर एक थर टाकून फुल बनला असे गृहीत धरत आहेत . मात्र नळकांडी फुलाचे काम हे निकृष्ट दर्जाच्या होत आहे . याचे चित्र सदर परिसरातील रस्त्यावर दिसून येत असून गुत्तेदार व इंजिनियर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे सर्व एकत्र येऊन मार्गदर्शनाखालीच काम केले असल्याचे स्पष्ट उत्तर व्हाट्सअप वर लिहून गुत्तेदार म्हणून मोरे यांनी स्पष्ट पत्रकारांना सुचविली आहे .
इस्टिमेट मध्ये तसे नाही व इंजिनियरने सुचविल्याप्रमाणे मी काम करत आहे असे उत्तर दिल्याने खरे खोटे हे मात्र कळण्यास योग्य नसून रस्त्याचे कामे निकृट होत असताना याचा प्रश्न मांडावा कोणाकडे अशी परिस्थिती कामाची झाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा