देशभरात या पदासाठी एकमेव पुष्यमित्र यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - येथील संशोधक पुष्यमित्र जोशीची ब्रिक्स संघटनेच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये भारत सरकारकडून युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
भारत सरकारच्या संयुक्त सचिवांसोबत ब्रिक्सच्या पुढील बैठकांमध्ये पुष्यमित्र भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करणार आहे. देशभरात या पदासाठी निवड झालेला पुष्यमित्र एकमेव आहे. ब्रिक्स ही भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून तयार झालेली शिखर संघटना आहे.
आता त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया व युनायटेड अरब अमीरात या देशांचाही समावेश झाला आहे. जगाच्या लोकसंख्येचा ४५ टक्के भाग व अर्थव्यवस्थेचा २८ टक्के भाग ब्रिक्स देश व्यापतात. एवढा मोठा विस्तार असणाऱ्या संघटनेत पुष्यमित्र जोशी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुष्यमित्र जोशीची वयाच्या २५ व्या वर्षी इंडियन सायन्स, काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटरपदी देखील निवड झाली होती. त्याच्या नावे दोन पेटंट देखील आहेत. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांचे विजेतेपद त्यानी मिळवले आहे. त्याने दोन पुस्तके व १५ हून अधिक शोधनिबंधाचे लेखन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा