जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच महीला व मुलींसाठीचे कायदे या विषयावर महाविद्यालयातील मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य बी. पी. देवसरकर यांनी केले. मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तसेच वक्ता म्हणून अँड. रिना दिलीप झंवर व विभावरी डूब्बेवार यांनी विद्यार्थिनींना महिलां साठीच्या कायदेबद्दल तसेच विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व महिला प्राध्यापक - कर्मचारी वर्ग तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. बी. बी. कपूर तर प्रा. पी.पी. देशपांडे यांनी आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा