चिंचोली येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज तर्फे जनजागृती
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - महाशिवरात्री महोत्सवाचे अवचित्य साधून शुक्रवारी प्रजापिता ब्रह्माकुरिजच्या वतीने आध्यत्मिक चित्र प्रदर्शनीचे आयोजन केले होते. यामध्ये चित्र परदर्शनीतून तणाव मुक्तीचा संदेश देण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजापिता ब्रह्मकुमारीजच्या वतीने चिंचोली महादेव येथे आत्मा ,परमात्मा, सृष्टी चक्र ,सर्वधर्म आत्मा, उनके पिता परमात्मा ,जीवनाचे लक्ष याबाबत विविध अध्यात्मिक चित्र परदर्शनी उभारण्यात आली. यातून मानसिक समाधान, तणाव मुक्ती, यांचा संदेश दिला.यावेळी चिंचोली येथील महंतांनी गोविंद नगर येथील ब्राहमकुमारीजच्या संचालिका अर्चना बहेणजी यांचा विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार केला. चिंचोलीसह परिसरातील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रदर्शनीचा लाभ घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा