पद्मश्री पोपटराव पवार व महंत रामगिरीमहाराज यांचे हस्ते पुरस्कार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम..
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधत, विविध क्षेत्रातील विविध महीलांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.यावर्षी दिला जाणारा सन २०२४ चा " आदर्श शिक्षिका नारीशक्ती पुरस्कार " वडझिरे,ता.पारनेर येथील सौ.शर्मिला दत्ता गाडगे यांना प्रदान करण्यात आला.आदर्शगांव योजनेचे कार्याध्यक्ष, पद्मश्री पोपटराव पवार व
गोदाधाम सरला बेटचे मठाधीपती महंत हभप रामगीरी महाराज यांचे शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे हे होते.
याप्रसंगी शिवव्याख्याते प्रदिप कदम,मुंबई विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण,प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव,आनंद दिघे इंग्लिश स्कुलचे सचिव अनिल राहणे,झी मिडीयाचे प्रतिनिधी व राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य समन्वयक दत्ता गाडगे,विठ्ठलराव पवार चेअरमन आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शर्मिला गाडगे यांना शैक्षणिक क्षेत्रातील तब्बल २१ वर्षांचा अनुभव असुन,त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामधे काम करताना अनेक नवनविन प्रयोग राबविले.त्यांनी प्रामाणिकपणे व सचोटिने केलेल्या कामाची पावती म्हणुन हा " आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ " त्यांना राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने हाॅटेल साई एस के शिर्डी,अहमदनगर येथे देवुन गौरविण्यात आले.सरला बेटचे महंत रामगीरीजी महाराज व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,चांदीची लक्ष्मीची मुर्ती,पैठणी साडी,घड्याळ असे होते.
स्वच्छ आणि पवित्र साधक आणि जेष्ठ समाजसेवकाचे हस्ते हा पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद...
शैक्षणिक क्षेत्रामधे आतापर्यंत खुप खडतर परीस्थिती मधुन प्रवास केला.सलग १५ वर्ष बिनपगारी अध्यापणाचे कार्य केले.मात्र हे काम करत असताना कधीही अध्यापणात कसुर केला नाही.माझा सन्मान राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देवुन करण्यात आला.त्याबद्दल मी संघाचे मनापासुन आभार व्यक्त करते.तसेच सरला बेटचे महंत हभप रामगीरी महाराज आणि जगाला आदर्शगांव योजनेचा संदेश देत प्रत्यक्षात कृती करणारे,आदर्शगांव योजनेचे कार्याध्यक्ष हिवरेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार अशा खुप स्वच्छ आणि पवित्र साधक आणि जेष्ठ समाजसेवकाचे हस्ते हा पुरस्कार मिळाला याचा मला अत्यानंद वाटतो.
पुरस्कार मिळाला म्हणजे जबाबदारी संपत नाही तर,ती वाढत असते याची जाणीव मला आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या गुरुवर्यांना,थोरा मोठ्यांना,जेष्ठांना समर्पित करते आणि राज्य मराठी पत्रकार संघाचे आभार मानते.
शर्मिला दत्ता गाडगे आदर्श शिक्षिका वडझिरे या पुरस्काराबद्दल शर्मिला गाडगे यांचे बंधु गुरुवर्य ह.भ.प. डाॅ. नारायणमहाराज जाधव,हभप श्रीरंगपाटील चौधरी, हभप समाधान महाराज शर्मा, खासदार अमोल कोल्हे, आमदार निलेश लंके,राज्य विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी,श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर,पश्चिम महाराष्ट्र वैधानिक महामंडळाचे मा.अध्यक्ष अशोकराव सावंत,अहमदनगर जिल्हापरीषदेचे बांधकाम व अर्थ समीतीचे सभापती काशिनाथ दातेसर,जि.प.चे मा.उपाध्यक्ष सुजितराव झावरेपाटील,दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, प्राचार्य जयसिंग लंकेसर,सरपंच निलेश केदारे,मा.सरपंच शिवाजीराव औटी,निलेश लंके प्रतिष्ठाणचे मा. तालुकाध्यक्ष अनिल गंधाक्ते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा