नलिका व जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगांव तालुक्यातील मौ.घुंगराळा येथील जलजीवन मिशन योजनेच्या 1 कोटी 25 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा वितरण नलिका व जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील. व नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य परबतराव पा. जाधव. यांच्याहस्ते करून काम सुरू करण्यात आले.
या योजनेचे काम जयलक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीने करणार असून गावातील प्रत्येक घरापर्यंत या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.यासोबतच गावचे सरपंच वसंत सुगावे पाटील गावातील विकासकामांसाठी शासनाकडे सातत्याने पाठवपुरवठा करत असून गावातील अंगणवाडीइमारत, रस्ते ,नाली यांची कामे चालू असून काही कामे पूर्ण झाली आहेत.
यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड ,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शामराव यमलवाड,सेवा सहकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पा. ढगे,माजी सरपंच प्रतिनिधी बालाजीराव मातावाड,शालेय समिती अध्यक्ष माधवराव पा.ढगे,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यशवंत पा.ढगे,गोविंदराव पांचाळ,सुभाष पत्तेवार,व्यंकटराव कंचलवाड,सेवा सहकारी सोसायटी सदस्य संभाजीराव तुटरवाड,माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे,माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पांचाळ,बालाजीराव हाळदेवाड,शंकरराव यलपलवाड, राम पा. सुगावे, बाबाराव पा. सुगावे,गंगाधर पा. ढगे,शंकर यमलवाड,संभाजी पा.सुगावे,गणपतराव गजभारे,अरुण सुर्यवंशी,मुरहरी तुरटवाड,बालाजी पांचाळ,शंकर यमलवाड,शिवराज यलपलवाड,राजू सुर्यवंशी,माधव सुर्यवंशी,रतन गंदमवाड,भगवान पा.ढगे,विलास पा.ढगे,राजेश पा.ढगे,विलास पा.सुगावे,विशाल पा.ढगे,शिवाजी पा.लुटे,योगेश पा.ढगे,यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा