शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
शिवशाही वृत्तसेवा, धाराशिव
कराड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रा. ईश्वरप्रसाद सुधाकरराव रितापुरे यांना 2024 या वर्षीचा जळगाव येथील नामांकित भरारी बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत दिला जाणारा बहिणाबाई विशेष सन्मान पुरस्कार नुकताच जळगाव येथील सागर पार्क मैदानावर भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
भरारी बहुउद्देशीय संस्थे मार्फत खानदेशच्या संस्कृतीला बळ देणारा तसेच आर्थिक ,सामाजिक ,शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने नेहमीच नामांकित विविध उपक्रम राबविले जातात . प्रा. रितापुरे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यावर्षीच्या बहिणाबाई विशेष पुरस्काराने मा.जिल्हा अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथे कार्यरत असलेले प्रा. राकेश दवडे, प्रा. डॉ.विवेक काहळे, प्रा.चित्तरंजन साळुंखे तसेच भुसावळ येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता चक्रधर रितापुरे उपस्थित होते.
प्रा.रितापुरे यांना मिळालेल्या या विशेष सन्मान पुरस्काराचे शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी यांनी व शासकीय तंत्रनिकेतन औषधनिर्माण शास्त्र विभाग अमरावती येथील प्राध्यापक व माजी विद्यार्थी, तसेच शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी प्रा.रितापुरे यांचे विशेष कौतुक केले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे प्रा.रितापूरे यांनी भरारी फाउंडेशन चे दीपक परदेशी व अक्षय सोनवणे यांचे विशेष आभार मानले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा