सदर गुडगुडी जुगार बंद करण्यात यावी अशी मागणी काही स्थानिक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी , शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे हंगरगा , शेळगाव छत्री, सालेगाव वजीरगाव , अशा यात्रेमध्ये बिनधास्त मटका व गुडगुडीचा डाव जोरात सुरू होता स्थानिक प्रशासनाला हाताशी धरण हा कारभार झाला असल्याची माहिती काही गावातील नागरिकांनी सांगितली. काही ठिकाणी परवानगी नसतानाही पोलिसांना माहिती नसतानाही जुगार बिनधास्तपणे सुरू होता . असे गावातील नागरिकांनी सांगितले त्यामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत पैशाचे हवाशा पाई, लकी नंबर सारखे पैसा मिळेल
म्हणून त्यामुळे विविध प्रकारचे प्रलोभन यामुळे मटका व जूगार खेळण्याची क्रेज वाढली असून झटपट श्रीमंत होण्याच्या प्रकारामुळे लाखो संसार दोस्त होऊन देशोधडीला लागत आहेत. मात्र यांचे प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीच घेणे देणे नसल्याचे दिसून येत असून गावातील गौरगरीब जनतेतील नागरिक व तरुण मंडळी या जुगार व गुरगुडीच्या नादी लागून उध्वस्त झाले आहेत . मात्र स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी सदर प्रकार हा गावातील यात्रेमध्ये बंद करून नागरिक व महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत.
सदर गुडगुडी जुगार बंद करण्यात यावी अशी मागणी काही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा