समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
दि.३ मार्च २०२४ रोजी नरसी येथे पिंजारी मन्सूरी,नद्दाफ समाजाचा जिल्हास्तरीय संघटन महामेळावा आयोजित करण्यात आला असून सदर मेळाव्याला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आरीफ अली मन्सूरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे तर नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष निहाल अहेमद मन्सूरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडणार असून नांदेड जिल्ह्यासस आजूबाजूच्या परिसरातील समाज बांधवांनी सदर महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मगदूमभाई पिंजारी नायगावकर व आरीफभाई पिंजारी नरसीकर यांनी केले आहे
दि ३ मार्च २०२४ रोजी रविवारी सकाळी ११ : ०० वाजता नुरी फंक्शन हॉल नरसी येथे पिंजारी,मन्सूरी,नद्दाफ समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष निहाल अहेमद मन्सूरी यांच्या नेतृत्वाखाली महामेळावा होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंजारी,मन्सूरी,नदाफ समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.आरीफ अली मन्सूरी हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून हसीब नद्दाफ (प्रदेश उपाध्यक्ष), सिकंदर नद्दाफ (प्रदेश महासचिव), पीर मोहम्मद मन्सूरी (प्रदेश महासचिव), मुन्नाभाई मन्सूरी (प्रदेश महासचिव), सय्यद बशीर मन्सूरी (प्रदेश सचिव), साबीर मन्सूरी (मुंबई कार्याध्यक्ष),सादीक पिंजारी (संघटन सचिव), हाजी कलीम पिंजारी (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), शेख अब्बास पिंजारी (सिनियर लीडर), निहाल अहेमद मन्सूरी (प्रभारी जिल्हाध्यक्ष),हाजी नवाबसाब पिंजारी (माजी सरपंच नरसी),नईम मन्सूरी (सिनियर लीडर),अक्सद भाई मन्सूरी (बीड जिल्हाध्यक्ष),समीरभाई मन्सूरी (जालना जिल्हाध्यक्ष),
तालेब मन्सूरी (उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष),यादुल्ला सर पिंजारी (लातूर जिल्हाध्यक्ष),अनवरभाई मन्सूरी (औरंगाबाद जिल्हाध्यक्ष), शेख महेबुब पिंजारी (परभणी जिल्हाध्यक्ष), शफीभाई पिंजारी (हिंगोली जिल्हाध्यक्ष),अनीसभाई पिंजारी (पुणे जिल्हाध्यक्ष), शेख गनीभाई पिंजारी (माजी जिल्हाध्यक्ष), अॅड जफर पिंजारी (शहराध्यक्ष नांदेड), जैनोदीनभाई पिंजारी (विशेष सल्लागार),अनवर भाई (सिनियर लीडर), महेबुब चॉंदसाब पिंजारी (माजी तालुकाध्यक्ष नायगाव), शेख बशीरसाब पिंजारी (माजी उपाध्यक्ष),अजीज पिंजारी (माजी यु.उपाध्यक्ष), वाहेद पिंजारी नांदेड, हाफीज हारुन पिंजारी नांदेड,रऊफ पिंजारी नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक शेख मगदुम अहेमदसाब पिंजारी नायगावकर व शेख आरीफ रसूलसाब पिंजारी नरसीकर हे असून नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील पिंजारी,मन्सूरी,नदाफ समाज बांधवांनी सदर महामेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या व पिंजारी बिरादारी नरसी व नायगावच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा