मंदिर समितीच्या विविध मागण्यांसाठी मनसे नेते दिलीप धोत्रे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ कर्मचारी पुरवणेबाबत टेंडर काढल्याने सध्या कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या स्थानिक तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार असल्याने मंदिर समितीने तात्काळ सदरचे टेंडर रद्द करावे. कार्यकाल संपल्याने मंदिर समिती बरखास्त करावी.
अशी मागणी मनसेनेचे दिलीपबापू धोत्रे यांनी केली आहे. यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की श्री.विठ्ठल मंदिर समितीमुळे पंढरपुरातील बेरोजगार तरुणांना काम मिळत आहे. मात्र नव्याने काढण्यात आलेल्या टेंडर मुळे सध्या सेवेत असणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणहून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या ठेकेदारांमुळे बाहेरील नागरिकांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.
सध्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर येणारा आर्थिक भार दुप्पट होणार असल्याने मंदिर समितीला आर्थिक फटका बसणार असून खाजगी ठेकेदाराला पोसण्याचे काम मंदिर समितीला करावे लागणार आहे.
यामुळे सदरची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात यावी.
कंत्राटी कर्मचारी म्हणून पंढरपूर येथीलच स्थानिक युवकांना संधी द्यावी.
मुदत संपल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा