आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजन
शिवशाही वृत्तसेवा,पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
पारनेरआमदार निलेश लंके यांच्या सकल्पनेतून आ. निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने नगरच्या नेमाने इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आ. निलेश लंके यांनी या तयारीचा बुधवारी आढावा घेतला. 1 ते 4 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आयोजित आलेल्या या महानाट्यासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून नगर दक्षिण मतदार संघातील विविध तालुक्यांसाठी व नगर शहरांसाठी एक ते चार दरम्यान 120 फूट किल्ल्याचा रंगमंच या महानाट्यासाठी 120 फूट किल्ल्याचा रंगमंच तयार करण्यात आला असून खरी खोरी लढाई हत्ती,घोडे, बैलगाड्या, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंग मंच म्हणून वापर करण्यात येणार आहे.
डॉ. कोल्हे यांची चित्त थरारक घोडे, स्वारी या महानाट्य मध्ये डॉ.अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्त थरार क घोडेस्वारी पाहण्यास मिळणार आहे महानाट्यासाठी 150 फूट लांब 80 फूट रुंद व पाच मजली किल्ल्याचा हुबेहूब प्रतिकृतीचा साध 67 लाख रुपये खर्चाचा सेट उभारण्यात आला आहे. महानट्यासाठी वीस लाख रुपयाची राजे शाही ड्रेपरी चार लाखांचे शास्त्रास्त्रे आणि युद्ध साहित्य वापरण्यात येणार आहे..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा