मानधन हे ३१ मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षण केलेल्या शिक्षकाचे मानधन तात्काळ मिळावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटने मार्फत बुधवारी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
३१ मार्चपर्यंत मानधन मिळावे यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्याकडे पाठवणार असल्याची माहिती शिष्टमंडळात देण्यात आली.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षणाचे कामकाज शिक्षकाकडे देण्यात आले होते शिक्षकांनी सदरील काम अतिशय कमी कालावधीत उत्कृष्टरित्या केले सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर शिक्षकांनी पूर्ण केले आहे मात्र एक ते दीड महिना होऊ नये मानधन देण्यासाठी कोणतीही हालचाल अद्याप झाली नाही तरी सदर सर्वेक्षण शासन निर्देशनाप्रमाणे केलेल्या शिक्षकांना सरसकट दहा हजार रुपये व प्रशिक्षणाचे पाचशे रुपये तात्काळ देण्याची मागणी केली आहे .
मानधन हे ३१ मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महसुल प्रशासनाकडून दिली आहे. या निवेदनावर अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम माने, मनोहर पोले ,बजरंग देवकर, नागनाथ चव्हाण , भानुदास क-हाळे , संतोष पडोळे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा