शेकऱ्यांचा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - पीक विम्या पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक विमा द्यावा अन्यथा माळशेलू रेल्वे स्थानकावर रेल रोकोचा इशारा शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी दालनासमोर बसले होते. आश्वासन देताच शेतकरी माघारी फिरले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे पीक विमा मिळावा यासाठी यापूर्वी आंदोलने केली ,त्याची दखल घेत पीक विमा कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील पीक विमा भरणाऱ्या पाच लाख १४ हजार शेतकऱ्यापैकी १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली. पीक विमा योजना ही देशाच्या पंतप्रधान यांच्या नावाने सुरू आहे. हे शेतकरी त्यांच्या परिवारातील नाहीत का असा सवाल करीत जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत तातडीने पीकविमा रक्कम देण्याचे डीएफसीइग्रो कंपनीला आदेश द्यावेत अन्यथा हजारो शेतकऱ्यांच्या वतीने रेल रोको आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, प्रवीण मते पाटील, कैलास सावके, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा