हिंगोली जिल्हात भूकंपाचे सौम्य धक्के
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली-शहर व परिसरामध्ये गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी पहाटे सहा वाजून पाच मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटेच हा प्रकार काही जणांचा लक्षात आल्याने तातडीने घराबाहेर येऊन ही चर्चा केली.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत असून काही वेळा भूगर्भातून आवाज होत असल्याचे प्रकार प्रामुख्याने कळमनुरी वसमत तालुक्यातील काही गावात जाणवत होते. यातच पुन्हा आता एकदा गुरुवार दिनांक आठ 21 मार्च रोजी पहाटे अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली शहर व परिसरात भूकंपाच्या अशा धक्क्यामुळे सकाळीच ही जाणीव लोकांना झाल्याने बरीच मंडळी घराबाहेर आली होती. ग्रामीण भागात पत्राच्या घरामध्ये अधिक प्रमाणात हा भूकंप जाणवला. तसेच सिमेंट घरामध्ये हा भूकंप घरातील पंखे व स्वयंपाक घरातील भांडे वाजल्यामुळे लोकांना हा भूकंपाचा धक्का जाणवला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा