हिंगोली - पूर्णा ते हिंगोली मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी रेल्वेला प्रवाश्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली ते मुंबई साठी दररोज जनशताब्दी रेल्वे गाडी उपलब्ध झाल्याने प्रवास्याना सोयीचे झाले आहे.त्यामुळे मुंबई ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर साठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. २३ मार्च ते २७ मार्च या दरम्यान द्वितीय श्रेणीतील सिटिंग सीट साठी मोठ्या प्रमाणात आरक्षण झाल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
आता उन्हाळी सुट्ट्या पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाश्याकडून या रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हायकोर्ट व रुग्णालयात जाण्यासाठी येणाऱ्या, जाणाऱ्या प्रवास्यांना खाजगी वाहनांच्या तुलनेत कमी प्रवास भाड्यात प्रवास करण्याची सुविधा मिळत आहे. द्वितीय श्रेणीसाठी रेल्वे द्वारे हिंगोली येथून वसमत साठी ७५ रुपये , परभणी १०० रुपये, जालना१३५, औरंगाबाद १५५, तर नाशिक साठी २१० रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे शैक्षणिक सहली, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून प्रवास्याना फायदेशीर आहे. प्रवास्यांनी या रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा , जेठानंद नेनवानी, गणेश अण्णा शाहू यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा