महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांचे मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
देशात बीज उत्पादन कंपन्या अनेक आहेत. परंतू महाबीज ही कंपनी शासकीय असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो. त्यासाठी बीज उत्पादन शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे तंत्रज्ञान वापरुन पारंपारिक शेती बरोबरच बीज उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधावी असे मार्गदर्शन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी केले. साखरखेर्डा येथील शिवाजी जाधव यांनी ऍग्री फाऊड लाईफ रेड (AFLR) या कांदा बीजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उन्हाळ्यात याचे बीजोत्पादन केले जाते. अशोक ठाकरे यांनी या परिसरातील जमिनीच्या मातीचे परिक्षण करुन या सुपीक जमीनीत मोठ्याप्रमाणात बीजोत्पादन शेतकरी करु शकतात.
महाबीज कंपनीचे तंत्रज्ञान वापरुन आणि महाबीज बीज उत्पादन करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन या भागातील शेतकऱ्यांना यापूढे निश्चित केले जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. साखरखेर्डा परिसरात बीजोत्पादन करण्यासाठी ज्या आवश्यक बाबी हव्यात त्या आहेत. मधमाशी, पाणी, वातावरण हे बीजोत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत. आज शिवाजी जाधव यांनी सेवानिवृत्ती नंतर शेती करीत असतांना पारंपरिक शेती बरोबर बीजोत्पादन शेतीकडे लक्ष केंद्रित करून आर्थीक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. या भागातील शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल.
यावेळी प्रयत्नशील शेतकरी तथा शिंदीचे सरपंच अशोक खरात, पिंपळगाव सोनारा येथील सरपंच नितीन ठोसरे, माजी सरपंच तोताराम ठोसरे, नितीन सावजी, दरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आश्रुबा बंगाळे, दत्ता घोडके, बबन मुदमाळी, कृषी अधिकारी नितीन धाटबळे, शैलेश पराते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा