सिंदखेडराजा देऊळगाव राजा तहसील बनले कर्मचाऱ्यांच्या आवडीचे ठिकाण.
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनीधी आरिफ शेख
सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये अनेक लोकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील शेतकरी विद्यार्थी महिला हे कामानिमित्त सिंदखेड राजा येथे गेले असता एका वेळेला त्यांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. सिंदखेड राजा ते साखरखेर्डा परिसर हा 50 ते 55 किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने येण्या जाण्या साठी खूप वेळ लागतो आणि त्याच्यावर शासकिय कामे हे ठरल्या वेळेत पुर्ण होत नाहीत. या आणि आणखी कारणे आता हळूहळू समोर येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पाच वर्ष किंवा पाच वर्षे पूर्ण होऊनही राजकीय पाठबळामुळे अनेक कर्मचारी हे सिंदखेडराजा तहसील मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत,त्यामुळे तहसीलमधील कामामध्ये हवी तशी पारदर्शकता येत नाही,
अनेक कर्मचारी हे अनेक वर्षापासून सिंदखेडराजा येथे असल्यामुळे त्यांचे व लोकांचे कनिष्ठ संबंध निर्माण झाले आहे, या संबंधामुळे एकाला न्याय देण्याची भूमिका तर दुसऱ्यावर अन्याय होण्याची भूमिका निर्माण होते,त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे देऊळगाव राजा व सिंदखेडराजा हे आवडीचे ठिकाण बनले असून काहीतर असे कर्मचारी आहेत की सिंदखेड राजा येथून बदली होऊन देऊळगाव राजा येथे गेले व त्यातून परत सिंदखेडराजा येथे आले ,त्यामुळे कुठेतरी आर्थिक लालसा निर्माण झाल्यामुळेच असे होत तर नाही ना अशी चर्चा होत आहे,त्यामुळे ज्या कर्मचारी पाच वर्षापेक्षा जास्त सिंदखेड राजा तहसीलमध्ये कार्यरत आहे किंवा ते परत सिंदखेड राजा तहसील मध्ये आले आहेत. या कडे नविन बदली होऊन आलेले उपविभागीय अधिकारी प्रा.खडसे हे काय निर्णय घेणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या सिंदखेडराजा देऊळगाव राजा तालुका सोडून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सध्या जनमाणसात जोर धरत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा