maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्वांनी बीसीजी लसीकरणाचा लाभ घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार

सर्व नागरिकांसाठी बी.सी.जी. लसीकरण अभियानाचे मे महिन्यात आयोजन
 
Chief Executive Officer Anup Shengulwar ,BCG for all citizens Vaccination campaign organized in the month of May ,  Hingoli , shivshahi news.

 शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी,  चंद्रकांत वैद्य
हिंगोली, दि. 22 : हिंगोली जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील सर्व युवक-युवती तसेच सर्व नागरिकांसाठी बी.सी.जी. लसीकरण अभियान मे महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. 
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षावरील नागरिकांचे बी.सी.जी. लसीकरण अभियान राबविण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात नुकतीच त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी श्री. शेंगुलवार बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, एस. एम. ओ. डॉ. मुजीब, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. सुनिल काळे, डॉ. सावंत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, डॉ. किरण कुऱ्हाडे, डॉ. कुपास्वामी, डॉ. अमोल गट्टू, डॉ. बी. के. गिरी, डॉ. व्ही. वाय. करपे, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते.
या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे एस. एम. ओ. डॉ. मुजीब यांनी बी.सी.जी. लसीकरण अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !