माजी आमदार टार्फे, जिल्हाप्रमुख गोपु पाटील यांच्या भेटी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
बाळापूर - जिल्ह्यातील बाळापूर परिसरात गुरुवारी पहाटे सहा च्या सुमारास ४.२ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळताच जिल्हाप्रमुख गोपु पाटील, माजी आमदार संतोष टार्फे यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली.
जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तातडीने शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना फोन करुन आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी भेट देऊन त्यांची पहाणी करून लोकांना मदत करा असे सांगितले.
त्या नंतर लगेच माजी आ.संतोष टारफे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर ,यांनी दांडेगाव, रामेश्वर तांडा येथे भेट देऊन पहाणी केली व लोकांची विचारपुस केली. यावेळी बऱ्याच घरांची पडझड झाली व भेगा पडल्याचे दिसून आले . प्रशासनास तात्काळ पंचनामे करून लोकांना मदत करा व त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करा ,जर पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले तर कोणती जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्या असे अधिकाऱ्यांना फोनवर सांगितले.
यावेळी मा.जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, मा.जि.प.सदस्य जगदेवराव साळुंखे, मा.जि.प.सदस्य कैलासराव साळुंखे ,डोगरकडा सर्कलप्रमुख बालाजी खुपसे व गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा