राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव येथील रहिवासी मयत भिवजी देविदास बेलकर वय २४ वर्ष रा. बळेगाव यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे व सगेसोयरे यांनाही आरक्षण अंमलबजावणीसाठी होत नसल्यामुळे दिनांक २१ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता गावा शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार आर टी पवार,पो.कॉ अशोकराव घुमे, पो कॉ बा-हाळे यांच्यासह पोलिस घटना स्थळी घटनेची पाहणी केली व पंचनामा केला आहे.
बळेगाव येथील पंडित गणपतराव पाटील बेलकर यांच्या शेतातील गट क्रमांक ३४४ मधील विहिर असून या विहिरीत अंदाजे २५ फूट पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे.
राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील एक २४ वर्षीय तरुण गावालगत असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व सरकार आरक्षण देत नसल्याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करीत आत्महत्या केली आहे.आसलयची माहिती गावातील नागरिकांनी सांगितले.
सदर देविदास बेलकर यांना दोन मुल होते . मयत भिवजी बेलकर हे कालपासून मराठा आरक्षण विषयी घोषणा देत होते. गावात सर्वत्र हि माहिती पसरली होती. घरात आई वडील एक भाऊ आसा भिवजी बेलकर यांच्या परिवार होता. घरी एक एकर जमीन होती. गरीब परिस्थितीमुळे मुळे शिक्षण घेवुनही नौकरी मिळाली नाही. आरक्षण हि मिळत नाही असे म्हणत आत्महत्या केल्याचे बळेगाव येथील नागरिकांनी सांगितले.पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीट प्रमुख पवार हे करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा