पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने जनावरांवर उपचार केले
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
सोयगाव.. तालुक्यातील तिडका गावातील हृदयाला हादरून टाकणारी घटना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने १० जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यातील तिडका या गावांमध्ये घडली. या प्रकरणी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने गावात धाव घेऊन १० जनावरांवर उपचार करीत त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.
तिडका गावालगत शेतकरी संदीप पगार यांनी गेल्या ५ ते ६ वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधला आहे. रस्त्यालगत हा हौद असल्याने येथून येणारी-जाणारी जनावरे पाणी पितात. शेतकरी पगार हे नियमित हौदात विहिरीतील पाणी सोडतात. त्यांनी या हौदात पाणी सोडले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या हौदातील पाणी प्यायल्याने २२ जनावरांना विषबाधा झाली. या हौदात पाणी प्यायलेली जनावरे जंगलात गेल्यानंतर चरताना
चक्कर येऊन कोसळली. त्यानंतर, त्यातील पाच बैल, चार म्हशी, दोन गायी, एक वासरू अशा १२ जनावरांना मृत्यू झाला. ही जनावरे संदीप मगर,विष्णु मगर, जगदीश मगर, शेख मुबारक, या चार शेतकऱ्यांची आहेत. ही बाब निदर्शनास येताच, त्यांनी एकच आक्रोश केला.
तिडका येथे पाण्याच्या हौदातूनविषबाधा झाल्याने १२ जनावरांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. १० जनावरांवर उपचार सुरू आहेत. मयत जनावरांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. - डॉ. दानिश बुखारी, पशुधन विकास अधिकारी, सोयगाव
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा