ह्या दाखवा काशिनाथ वेताळ यांची फिर्याद
शिवशाही वृत्तसेवा,, शिरुर जिल्हा प्रतिनिधी :-फैजल पठाण
फिर्यादी श्री काशिनाथ नारायण वेताळ हे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाने पदोन्नती मध्ये केलेल्या अन्यायाच्या विरोधात श्री काशिनाथ नारायण वेताळ यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे जाऊन माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुख्याध्यापक पद स्वीकारल्याने शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकारी हे त्यांच्यावरती चिडून होते. त्यामुळे संस्थेचे सचिव व अध्यक्ष त्यांना नेहमीच टार्गेट करीत व शाळेतील इतर शिक्षक व क्लर्क यांना देखील फिर्यादी यांना मुख्याध्यापक म्हणून काम करताना कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करण्याबाबत सांगून दैनंदिन कामकाज करताना मानसिक त्रास देत होते. माहे मार्च 2023 रोजी चे प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन देयक हे संस्थेच्या सचिवांच्या सांगण्यावरून शाळेचे वरिष्ठ लिपिक श्री सुरज किसन जाधव यांनी परस्पर त्यांना अधिकार नसतानाही स्वतःच्या सहीने शिक्क्याने तयार करून शिक्षण अधिकारी पुणे यांच्या कार्यालयात पाठविले होते.
त्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी संस्थेस सदर लिपिका विरोधात कारवाई करणे बाबत कळविले होते परंतु लिपिका विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट तीन महिन्यांचे वेतन देयक सादर करण्यास फिर्यादी यांना लिपिकाने कोणतीही मदत केली नाही.तसेच सदरचे बिल ऑनलाईन दाखल करण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड देखील फिर्यादी यांना आरोपींकडून दिला जात नव्हता. फिर्यादी यांचा मुख्याध्यापक म्हणून आदेश न मानण्यासाठी लिपिक सुरज जाधव यास शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालकांपैकी शाळा समिती अध्यक्ष श्री प्रकाश बोरा संस्थेचे सचिव नंदकुमार श्रीरंगराव निकम संस्था अध्यक्ष श्री अनिल बोरा शाळा समिती सदस्य श्री कुमार बोरा प्रशालेचे पर्यवेक्षक श्री सुभाष बबन पाचकर हे मदत करत होते.
फिर्यादी वेताळ यांचे वैद्यकीय बिलावरती संस्थेचे सचिव यांनी सही न करणे ,वरिष्ठ वेतनश्रेणी हेतू पुरस्सर न देणे,मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या दृष्टीने पिडीसीसी बँकेतून मंजूर करण्यासाठी स्वाक्षरी न करणे, फिर्यादींच्या रजा शिल्लक असताना दुष्ट हेतूने व जाणीवपूर्वक त्यांच्या रजा विनावेतन करणे, सर्व संस्थेतील पदाधिकारी व शाळेतील शिक्षक या सर्वांच्या समक्ष अपमानित करणे, संस्थेतील सर्व शिक्षकांना एकत्रित करून भाषणातून अवमानकारक वागणूक देणे, अशाप्रकारे फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याकारणाने जातीय द्वेषातून मानसिक शारीरिक व आर्थिक छळ करणे या आरोपांखाली रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस होऊनही अद्याप आरोपी राजरोसपणे फिरत आहेत. अशी माहिती फिर्यादी ने दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा