maharashtra day, workers day, shivshahi news,

मनोज जरांगे पाटलांचे पारनेर मध्ये जंगी स्वागत

 मनोज जरांगे पाटील यांची शनिवार दि २३ रोजी पारनेर मध्ये होणार सभा
Meeting of Manoj Jarange Patil , parner ,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर  जिल्हा प्रतिनिधी , सुदाम दरेकर पारनेर 
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची शनिवार दि २३ रोजी पारनेर मध्ये होणाऱ्या सभेच्या निमित्ताने आगमन प्रसंगी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे .
मराठा आरक्षणासाठी अक्षरशः राज्यभर सभा घेवून पिंजून काढल्याने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे . त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या त्यांच्या सभांना सर्रास पणे प्रशासना कडून परवानगी नाकारण्यात येत आहे . पण पारनेर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी शनिवारी दुपारी होणाऱ्या सभेसाठी पारनेरच्या पोलीस प्रशासना कडे परवानगी मागितली असता , त्यांनी ही ती दिल्याने मराठा बांधवांचा उत्साह आनंद व्दिगुणीत झाला व सभेच्या तयारी जोरदार पणे सुरू करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांचे पारनेर मध्ये आगमन होताच , त्यांच्यावर ५० जेसीबी मशिनव्दारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे . त्यासाठी १ टन फुले मागिवण्यात आली आहे . तर क्रेन मशिन व्दारे ५१ फुटांचा गुलाब पुष्पांचा हार त्यांना घालून स्वागत करण्यात येत आहे .
मनोज जरांगे पाटलांची सभा पारनेर च्या बाजार तळावर होत असून या व्यासपिठा ला रंगरंगोटी करून सजावण्यात आले आहे . संपूर्ण पारनेर तालुक्यात या सभेनिमित्त जाहिरात करून जास्तीत जास्त समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . त्यासाठी जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गण व गावोगावी बैठकांचे सत्र घेण्यात आले असून वातावरण निर्माण करण्यात आले आहे . ही संपूर्ण अत्यंत शांततेने व नियोजन बद्द पद्धतीने होणार आहे .
मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेला पारनेर चे पोलीस निरीक्षक समीर बारवकर  यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . त्यासाठी ५ पोलीस अधिकारी , ५० पोलीस अंमलदार , १० महिला पोलीस अंमलदार , ५ वाहतूक पोलीस अंमलदार , १० गुन्हे शाखेतील साध्या वेशातील अधिकारी, १ स्ट्रायकिंग फोर्स असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !