महान क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
देश स्वतंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे क्रांतिवीर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त नायगाव येथे रविवार रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून या महान क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नायगाव शहरातील सुरेश पाटील कल्याण कॉम्प्लेक्स कॅनरा बँक समोर रोहित बारच्या पुढे मेन रोड नायगाव बाजार येथे दिनांक 24 मार्च 2024 रविवार रोजी दुपारी ठीक 12 वाजता शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन डॉ .मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तर व्याख्याते प्रसिद्ध प्रबोधनकार शाहीर दिगु तुमवाड, कष्टकरी संघटनेचे सचिव कॉम्रेड देवराव आईलवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे,तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शंकर गड्डमवार प्रसिद्ध विचारवंत,प्रा. प्रकाश हिवराळे, रा.ना. मेटकर, गंगाधर चव्हाण यांची उपस्थित राहणार असून यावेळी दलित मित्र पुरस्कार प्राप्त असलेले शाहीर गंगाधर वाघमारे यांचा सन्मान होणार आहे, तरी या अभिवादन सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.हनुमंत हांडे, धोंडीबा वाघमारे, माधव ऐंजपवाड, डि.के पवार व कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार माधव बैलकवाड यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा