सरपंचासह गावकऱ्यांनी केले कामबंद
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव - शेळगांव ,छत्री ते दुगांव या दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम गुतेदाराकडून अंदाजपत्रकातील नियमानुसार न करता निकृष्ट दर्जाचे होत आहे असे कळल्या नंतर संतप्त झालेल्या सुजलेगांवचे सरपंच दत्ता आईलवार यांच्यासह गावकऱ्यांनी व इतर गावच्या सरपंच गावकरी यानी रस्त्याचे काम बंद पाडले.या मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे.
नायगांव सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे चालु आहेत. अधिकारी व गुतेदार यांचे संगनमत या मुळे तसा कामाचा दर्जा ढासळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नांदेडला मुक्कामी राहुन सर्व कामे पाहत आहेत. त्यामुळे नायगांव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कामांचा पुरता बोजवारा उडालाआहे.तर गुतेदार राजकीय लोकप्रतिनिधी यांचे साटे लोटे असल्याने 'तेरी भी चूप मवरी भी चूप अशी अवस्था सरबतर पहावयास मिळत आहे.
शेळगाव छत्री ते दुगाव रस्ता निकृष्ट
शेळगांव छत्री ते दुगाव ह्या दहा किलोमीटर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे पंधरा कोटीचे काम नांदेड जिल्हात काही महिन्यांपुर्वी चर्चेत आलेल्या मुदखेड तालुक्यातील दादाराव ढगे यांच्या ओमकार कन्स्ट्रक्शन्सला मिळाले.त्यांना काम कसे दिले व कोण्ही दिले याची सर्वत्र चर्चा होत आहे.
शेळगांव छत्री ते दुगाव या रस्त्यासाठी दहा वर्षांनंतर अनेक गावच्या संघर्षानतर निधी मिळाला. हा रस्ता दर्जे दार होईल अशी लोकांना अपेक्षा होती. पण गुतेदार आणि अभियंत्याच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे पाहुन सुजलेगावचे ग्रामस्थ संतापले. सरपंच दत्ता आईलवार यांच्यासह ग्रामस्थांनी सदरील काम बंद पाडले. सा.बां.चे उपअभियंत्यांना कामाच्या ठिकाणी बोलावून कामाची जागेवरच चौकशी करा, असा पवित्रा घेतल्याने उपअभियंत्याना चांगलाच घाम फुटला होता.
रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरणे, रस्त्याच्या साईड भरण खोदकाम न करता भरणे, दबई न करणे, कामाची उंची अंदाजपत्रकातील नोंदीनुसार कामे न करणे, कामावर कामाचा तपशिल अमलेला नामफलक काम तरी लावण्यात 3/6 नाही, ही बाब ग्रामस्थानी उपअभियंत्यांच्या निर्दशनास आणून दिली.त्याचवेळी उपअभियंत्यांनी चुक झाल्याचे मान्य केले. संबंधीत कामाची चौकशी करूनच देयके देण्यात यावी आणि अस लेखी पत्र देऊन आपली सुटका होईल असा दम अभियंत्यांना दिल्याने अभियंत्याची चांगलीच परेषांनी.झाल्याचं सांगण्यात आले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा