वांजरगाव (सरला बेट )येथील गोदावरी नदीवर सिमेंट बंधारा दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी (शिव शाही वृत्तसेवा)
वांजरगाव (सरला बेट )येथील गोदावरी नदीवर सिमेंट बंधारा दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करून 12 कोटी 89 लाख रुपये निधी मंजूर करून आणलेल्या कामाचे भूमिपूजन सोहळा आज ह.भ. प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली आमदार रमेश बोरनारे यांनी श्रीफळ फोडून पार पाडला.
यावेळी उपनगराध्यक्ष सागरबाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, ह.भ.प. भारत महाराज, ह. भ. प. विष्णू गुरुजी महाराज, मधुकर महाराज, मा. तालुकाप्रमुख खुशाल सिंग राजपूत, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंखे, शहर प्रमुख पारस घाटे, मा सभापती अंकुश हिंगे, संचालक प्रशांत त्रिभुवन, युवा नेता शहर प्रमुख श्रीकांत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पंचक्रोशीतील भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा