maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदुरा खून प्रकरणाची उकल तीन आरोपींना अटक

एका कारसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त 
Nandura murder case solved , Three accused arrested , buldhana , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा प्रतिक सोनपसारे 
नांदुरा मोताळा रोडवर २ मार्च रोजी झालेल्या खून प्रकरणाची उकल करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी स्थागुशा पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींजवळून एका कारसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्तमाहितीनुसार, नांदुरा मोताळा रोडवरील माळेगाव शिवारातील शेताच्या धुर्यावर एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोणवडी येथील संदिप अर्जून तायडे (३८)यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून नांदुरा पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यात आली. तो हर्षल ऊर्फ पप्पु सदाशिव घोपे ३२ वर्षे रा. घाटपुरी ह.मु. शेगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने आकाश ऊर्फ आदिनाथ आनंदा रावणकर २८ रा. घाटपुरी ता. खामगाव, रुपेश देविदास कुरवाडे २८ रा. शिवनेरी चौक, शेगाव आणि मयुर विजय शेलार २४ रा. साईनगर वाडी ता. खामगाव, यांना अटक करण्यात आली. 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पोनि. विलास पाटील , सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि. सचिन कानडे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, पंकज मेहेर, पोना. गणेश पाटील, पोकॉ. विजय सोनोने, दिपक वायाळ, सुरेश भिसे, मिलींद जवंजाळ, संजय जाधब, राहूल ससाने, शैलेश बहादुरकर, विनायक मानकर, विनोद भोजने, कैलास सुरडकर, रवि झगरे, रवि सावळे, पोकॉ. संदिप टाकसाळ , पोकॉ. प्रकाश गव्हांदे, पोहेकॉ. राजू आडवे यांनी केली.

जुन्या वादातून घडविले हत्याकांड
मृतक युवकाला जुन्या वादातून आरोपींनी संगनमत करून ठार मारले. गत काही दिवसांपासून तिघेही त्याच्या मागावर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे समजते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !