भोकरदन तालुक्यातील कुंभारी परीसरातील घटना
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण
तेराव्याच्या कार्यक्रमात आलेल्या तायडे कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळे
मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावा जवळील एका वाडीत घडली आहे समर्थ परशुराम तायडे, वय 5.वर्ष,रा.आमठाणा, ता.सिल्लोड, असे बालकाचे नाव आहे या विषय सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जालना रोडवरील कुंभारी गाव आगोदर एक वाडी आहे तर या ठिकाणी गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी झाले कार्यक्रम आटोपून दि.4.मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते मात्र इतर मुलांबरोबर खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने कानाला लावली आणी त्याच क्षणी त्याचा अतिशय भयानक विस्फोट होऊन यात बालकाचे कानाला व हाताचे बोटाला गंभीर मार लागून त्यातुन बालकाचा मृत्यु झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले दरम्यान भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले सदरील घटनेमुळे संपुर्ण परीसरात हळहळ वक्त होत आहे घटनेचा पंचणामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आला आहे दरम्यान तायडे कुटुंबाची घरची परीस्थीती हलाखीची असल्याने समर्थ याचे वडील हात मजुरी करत आहे ज्या ठिकाणी काम मिळाले त्या ठिकाणी ते काम करत आहे घटनेची नोंद भोकरदन पोलिस ठाण्यात धो शाही न्यूज साठी भोकरदन प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण*
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा