हिंगोली लोकसभेच्या तिरंगी लढतीत कोण ठरणार बाजीगर

महाविकास आघाडी प्रमाणे महायुतीत देखील नाराजीचे सूर उमटत आहे.
Who will be the winner in the Lok Sabha three-way fight , Lok Sabha Elections , Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदार संघात आघाडी व युतीचा उमेदवार दिला असून आता वंचित आघाडीने संभाव्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास तिरंगी लढतीची श्यक्यता नाकारता येत नाही. यामुळे या अटीतटीच्या लढतीत बाजीगर कोण ठरणार अशी चर्चा सुरू आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघ हा कोण्या पक्षाचा बालेकिल्ला म्हणावे तसे नाही , मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत राजीव सातव यांनी मोदी लाटेत एक हाती विजय मिळवीत लोकसभेत पोहचले .  लोकसभा निवडणुकीत २००९ मध्ये शिवसेनेकडून विजयी झालेले तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे हे काँग्रेस मध्ये प्रवेश करून २०१९ ची निवडणूक लढविली या निवडणुकीत काँग्रेसकडून वानखेडे तर युतीकडून हेमंत पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते.२०१९ मध्ये राजीव सातव यांनी माघार घेत वानखेडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले त्यामुळे सेनेतून आलेल्या वानखेडेना काँग्रेसच्या उमेदवारांनी नाकारत त्यांचा पराभव केला. या निवडणुकीत सेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळी देखील दहा ते अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.
आताही तशीच परिस्थिती असून केवळ महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर तर शिंदे सेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने हे दोघेही उमेदवार जिल्ह्या बाहेरचे असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक उमेदवारांना उमेदवारी न दिल्याने महायुतीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.दोन्ही पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने आता वंचितच्या  उमेदवाराकडे लक्ष लागले आहे. नुकतेच बी. डी. चव्हाण हे वंचित मध्ये प्रवेश करून वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून  निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत .
मात्र खरी लढत ही तिरंगी राहणार आहे. वंचित आघाडीच्या उमेद्वारामुळे ही निवडणूक रंगत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वंचित चे चव्हाण देखील तुल्यबळ उमेदवार असल्याने आघाडी व युतीतील उमेदवारास जेरीस आणण्याची ताकद आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेत यावेळी काहीही उलथापालथ होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. लोकसभा मतदार संघात दुसऱ्यांदा उमेदवार विजयाची परंपरा नाही ,त्यामुळे  लोकसंपर्क व कामे केल्याचा दावा  सगळे जण ठोकत आहेत. याशिवाय सकल मराठा समाजाच्या वतीने ही उमेदवार उभा केल्यास मतांची विभाजनी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाची मते कोणाच्या पारड्यात पडणार यावर ही सर्व काही अवलंबून आहे.

आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाजीगर कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ही जागा भाजप कडे येणार असल्याने रामदास पाटील सक्रिय होते त्यामुळे दोन वर्षांपासून लोकसभा मतदार संघात कामे ही केली. आता तेही नाराज असून एखाद्या वेळेस अपक्ष उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी प्रमाणे महायुतीत देखील पदाधिकारी यांच्यात नाराजीचे सूर उमटत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !