पळवलेला मुलगा पोलिसांनी शोधून काढला
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर वैद्य
हिंगोली - छत्रपती संभाजी नगर येथे जाण्यासाठी निघालेल्या बर्गेवाडी ता. औंढा नागनाथ येथील अमोल राठोड यास औंढा पोलिसांच्या मदतीने राजस्थानातील भरतपूर येथील पोलिसांनी अवघ्या एका तासात ताब्यात घेतले. चित्रपटात शोभेल अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. मुलगा सुखरूप असल्याचा संदेश मिळाल्यानंतर अमोलच्या कुटुंबियांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
औंढा तालुक्यातील बर्गेवाडी येथील अमोल राठोड हा छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरतीची तयारी करतो, होळीच्या सणा निमित्य तो गावाकडे आला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी तो छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी निघाला. परभणी येथून सचखंड एक्स्प्रेसने छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना त्याला काही लोकांनी पळविले. सायंकाळी उशिरा पर्यन्त अमोलचा सुखरूप पोहचल्याचा संदेश आला नासल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सूरु केला.
दरम्यान, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अमोलच्या मोबाईलवरून संपर्क झाला.यावेळी पळविणाऱ्या व्यक्तींनी मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले त्यानुसार त्यांनी औंढा पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, किशोर पोटे, संदीप टाक यांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिल्यानंतर सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, यांच्या पथकाने अमोल याच्या मोबाईल चे लोकेशन घेतले असता ते राजस्थानातील भरतपुर जिल्ह्यात असल्याचे स्पस्ट झाले.
जी. श्रीधर यांनी तातडीने सूत्रे हलवीत भरतपूर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र मीना यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. व लोकेशन दिले.4राजस्थान पोलिसांनी अवघ्या एका तासात अमोलची सुटका करून त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.त्यानंतर याबाबतची माहिती हिंगोली व औंढा पोलिसांना दिली. मुलगा सुखरूप असल्याचा निरोप मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा