बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिवशाही वृत्तसेवा, (जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा) , प्रतिक सोनपसारे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर झाली असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर वंचित बहुजन आघाडीने देखील पहिली उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे.
बुलढाण्यातून वंचितकडून वसंतराव मगर यांना तिकीट देण्यात आले आहे रविकांत तुपकर सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली त्यामुळे सध्या खासदार असलेले शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्या समोर तगडे आव्हान असणार आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा