वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
यांनी मनोज जरांके पाटील यांची भेट घेतली.
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी, अनिल सूर्यवंशी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांके पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली.दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवर एक तास चर्चा झाली.
म्हणून जरांगे पाटील यांनी गावामध्ये बैठका घेऊन निवडणूक लढवावी का? मतदार संघातून एकच अपक्ष उमेदवार द्यावा का? याबद्दल समाजाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल पाहून तीस तारखेला मनोज जरांगे पाटील पुढील निर्णय घेतील. मराठा आणि वंचित जर एकत्र आले तर महाराष्ट्रात नवीन राजकीय अध्याय सुरू होईल असे या भेटीतून निदर्शनास आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा