यात्रेत जवळपास पाचशे ते सहाशे भाविक सहभागी झाले
हिंगोली - हदगाव येथून निघालेल्या कानिफनाथ पायदळ कावड यात्रेचे रविवारी सकाळी आठ वाजता पार्वती टॉवर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रेतील सहभागी ५०० ते ६०० भाविकांना चहा ,फराळाची व्यवस्था करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हदगाव तालुक्यातील डोरली येथून कानिफनाथ पायदळ कावड यात्रा हिंगोली कडे मार्गस्थ झाली सहा दिवसानंतर या कावड यात्रेचे हिंगोली येथील पार्वती टॉवर येथे रविवारी आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. याठिकाणी गुरुकृपा हॉटेल येथे चहा, फराळ घेतल्यानंतर ही कावड यात्रा पुढे सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे रवाना झाली. या यात्रेत जवळपास पाचशे ते सहाशे भाविक सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. हदगाव ते खैरी घुमट अशी जवळपास १६० किलोमीटरचे अंतर पायदळ कापण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात असे भाविकांनी सांगितले.
यावेळी ऍड. सुरेश गडदे, पंजाबराव हाराळ , सगणाराव ढाले, डॉ. शाहूराज ढाले, बाबुराव हराळे , गंगाधर लोंढे, भूतनर, नरोटे, ऍड. विपीन अर्धापुरकर ,ऍड. बालाजी जगताप , ऍड. सचिन पोले, ऍड. ऍड. मस्के, कानिफनाथ दिंडे, गुणाराव पोले, ऋषीकेश हराळे , दीपक अग्रवाल, व्यंकटेश गडदे , शिवम हाराळे, आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा