वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना घरात बसुन पोस्टल बॅलेटव्दारे मतदान करण्याची सुविधा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वयाची ८५ गाठली आहे अशा मतदारांना मतदान केंद्रावर जावुन मतदान करणे अवघड आहे अशा मतदारांनसह अपंगानाही घरात बसुन पोस्टल बॅलेटव्दारे मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास नक्कीच मदत होईल .मतदान करण्यासाठी वाईत १९४ खंडाळा १३१ आणी महाबळेश्वर मध्ये १२९ अशी मतदान केंद्रांची संख्या आहे ., अशी माहिती वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली .या वेळी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती तेजस्वीनी खोचरे पाटील तर खंडाळा तहसीलदार अजित पाटील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वैभव पवार महाबळेश्वर तहसील कार्यालयातील दिपक सोनवले हे अधिकारी या वेळी उपस्थित होते .
प्रांताधिकारी राजेंद्र जाधव बोलताना पुढे म्हणाले होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीची मतदान करण्याचा दि.७ मे आहे या कालावधीत ऊन्हाची तिव्रता खुपच असते .मतदान करण्या साठी आलेल्या मतदारांन साठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह सावलीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे .तर काही ठिकाणी आदर्श मतदान केंद्र तयार करुन त्यात स्थानिक असणाऱ्या वैभवांच्या
परंपरेचे दर्शन घडणार आहे .केंद्रांनवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत .ज्या वाहनांच्या मधुन निवडणूक साहित्य पोहचवले जाणार आहे त्या वाहनांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे .
निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांची सहज रित्या तक्रार करता येणार आहे आणी त्याची गांभीर्याने दखल देखील घेतली जाणार आहे .
या साठी तज्ञ अपझोरो टिमची देखील नियुक्ती करण्यात आली आहे . निवडणूक काळात जे कोणी आदर्श आचारसंहितेचा भंग करेल त्याची गय न करता त्याच्या विरुद्ध
कडक कारवाई करण्यात येणार आहे . मतदान करण्या साठी लागणाऱ्या एव्हीएम मशीन सातारवरून आणुन त्या वाईच्या एमआयडीसीत असणाऱ्या वखार महामंडळाच्या हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहेत .वाई खंडाळा महाबळेश्वर या तिनही तालुक्यात निवडणूक काळात प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्या साठी तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा