persaonl care, mega workshop’हा कार्यक्रम संपन्न
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
गोदावरी फाऊंडेशन कायमच महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आग्रेसर असते तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन नियमित करीत असते असे वक्तव्य हिंगोली येथे गोदावरी फाऊंडेशन व गोदावरी अर्बन च्या वतीने आयोजित ‘persaonl care, mega workshop’ या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
गोदावरी समूहाचे संस्थापक खासदार हेमंत पाटील साहेबांच्या मार्गदशनाखाली व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाऊंडेशन महिला,युवक,युवती,कामगार,जेष्ठ नागरिक व दिव्यांगसाठी गेल्या अनेक वर्षापासून हिंगोली,नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात काम करीत आहे.त्याच्याच एक भाग म्हणून आर्चिज ब्युटी वर्ल्डच्या माध्यमातून हिंगोली शहरतील महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ अर्चना जाधव यांचे ‘persoanl care’ या विषयावर महीलांसाठी कै.शिवाजीराव सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये अर्चना जाधव यांनी महिलांनी दैनदिन सौंदर्यासह वैयक्तिक काळजी कशी घ्यावयाची,कार्यक्रमच्या वेळी,लग्न समारंभात घ्यावयाची काळजी करायची तयारी, साडी नेसण्याचे विविध प्रकार, याविषयी त्यांना समजेल अश्या छोट्या छोट्या टिप्स व प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले.
गोदावरी फाऊंडेशच्या समन्वयिका नैना पैठणकर यांनी उपस्थित महिलांचे विविध छोटे छोटे गेम घेऊन सर्वांना धमाल करायला भाग पाडले.यावेळी पुढे बोलतांना राजश्री पाटील म्हणाले की प्रत्येक कुटुंबीयांनी महिलांच्या मताचा आदर केला पाहीजे,त्यांना आवडेल त्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली पाहिजे.तसेच महिलांनी देखील मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार न करता आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग स्वतःसाठी, कुटुंबासाठी,आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी व सुदृढ समाजासाठी केला पहिजे असे देखिल सांगितले.
यावेळी हिंगोली जिल्हा दिशा समिती सदस्य तथा हिंगोली जिल्हा महिला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनीता मुळे,मा.जि.प.सदस्या तथा उद्योजिका अश्विनी यंबल,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा देवकते,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुशीला आठवले,विद्या पवार लोकमत सखीमंचच्या सपना भागवत यांच्यासह हिंगोली शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोदावरी अर्बनच्या ममता ओझा,रंजना हरणे व गोदावरी फाउंडेशनच्या सोनल सुलभेवार,शिवाजी पाताळे यासह सर्व टीमने परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा