अखेर मुंबई कडे प्रस्ताव दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
नायगाव शहर हे तालुका, बाजारपेठ, आणि मतदार संघ असूनही सबंध महाराष्ट्र मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातून लोकांची वर्दळ येथे दररोज ये जा करीत असताना शहरात बस स्थानक नसल्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांनी शहरात बस स्थानक होण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून अविरत संघर्ष करीत असताना याबाबत शासनाने या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे विलंब असलेल्या महत्वपूर्ण जनहितार्थ विषयांमध्ये गजानन पाटील चव्हाण यांच्या जिद्दीला मत्वदेत काम केले आहेत.
मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून नायगाव शहर सर्वत्र ओळखले जाते या शहरात मोठी बाजारपेठ, बैल बाजार, शाळा व सर्व विषयाचे महाविद्यालये, आडत दुकाने, उपजिल्हा रुग्णालय, कापड दुकाने अशा अनेक सुविधा उपलब्ध येथे असल्यामुळे खरेदी विक्रीसाठी लाखोच्या संख्येने लोकांची नित्यरोज वर्दळ असते म्हणून गजानन पाटील चव्हाण यांनी हा जनहितार्थ विषय हाती घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून नायगाव शहरात बस स्थानक उभारण्यासाठी शासनाच्या अनेक कार्यालयात सदर मागणीचा प्रस्ताव ठेविला तसे ना हरकत आवश्यक असणारे कागदपत्र घेतले आहे सन 2009 पासून आज पर्यंत बस स्थानकासाठी पाठपुरावा चालू आहे नायगाव तालुका हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 लगत असून नायगाव येथील गट क्रमांक 420 क्षेत्र 0. 40 चे जाय मोक्याचे पंचनामा सह विविध बाबीने कागदपत्राचा पाठपुरावा देखील झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नांदेड यांना जागा हस्तांतर करून बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून बस स्थानक उभारणे अत्यंत निगडीचे आणि गरजेचे ठरते आहे. तसेच सहाय्यक संचालक नगर रचना नांदेड या कार्यालयामध्ये सातत्याने पाठपुरावा करून गट क्रमांक 420 या गटावर एसटी साठी आरक्षण क्रमांक 26 असे टाकण्यासाठी चिकाटीने पाठपुरावा गजानन पाटील चव्हाण यांनी केला आहे.
नायगाव शहर एवढे मोठे सोयी सुविधाचे माहेर घर असूनही यात शालेय विद्यार्थी, महिला, वृध्द यांना उन्हाळ्यातील उन्हाचे चटके आणि पावसाळ्यातील पाण्याने भिजावे लागते, कारण एसटीची प्रतीक्षा करेपर्यंत चार प्रवासी थोडा विसावा घ्यावा म्हणून सुद्धा प्रवासी निवारा इथे उपलब्ध नाही .
म्हणून ती पूर्ण उनिवा कमतरता येत्या काही महिन्यांमध्ये भरून काढण्यासाठी गजानन पाटील चव्हाण यांनी शपथ घेतली आहे .गजानन पाटील चव्हाण यांचा 15 वर्षापासूनच्या बस स्थानकासाठी पाठपुराव्यामुळे गेल्या एक महिनाभरापूर्वी शासन प्रतिनिधी भूमिलेखा अधिकारी राजेश खरात, मंडळ अधिकारी, तलाठी, संबंधित इंजिनियर माधव धोंडगे, विभागीय नियंत्रण म.रा. परिवहन मंडळ दत्तात्रय कुलकर्णी आणि लिपिक नंदू पाटील बेंद्रेकर यांनी जाय मोक्यावर जाऊन जागेची पाहणी केली मोजमाप आणि तसा प्रस्तावही शासनाकडे दाखल देखील केला आहे,हि पाहणी करते वेळी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांचे सहकारी भाऊराव पाटील चव्हाण, किशोर महाराज धर्माबादकर शंकर पा हंबर्डे यांची उपस्थिती होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा