विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
शहरातील रीसाला बाजार भागात असलेल्या रमेशचंद्र बगडिया यांच्या निवासस्थानी असलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज सकाळपासून महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता महादेवाचा महाअभिषेक रमेशचंद्र बगडिया यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळ पासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरुष यांनी गर्दी केली होती. संध्याकाळी 6 वाजता भजन संद्या घेण्यात आली. यावेळी महादेवांची अनेक गीत गायन करण्यात आले. त्यानंतर 7 वाजता महाआरती करण्यात आली. आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा