मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
ईव्हीएम मशिन हटवून मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्यावे, एक देश एक अभ्यासक्रम कायम करावे, कंत्राटी नोकर भरती बंद करावे, तहसील व पंचायत समितीमधील मनमानी कारभार व भ्रष्टाचार थांबवा या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने गणपत रेड्डी व डी के पवार यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला आहे.
नायगाव शहरातील जुनी तहसील येथून हेडगेवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती पिता लहुजी साळवे चौकापासून तहसील कार्यालयाकडे मोर्चा भर उन्हात प्रचंड घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर धडकला आहे, यामध्ये प्रा. डॉ. शंकर गड्डमवार ,संघटनेचे प्रमुख प्रा. रामचंद्र भरांडे, कामगार आघाडीचे प्रमुख रावसाहेब पवार, गणपत रेड्डी, दत्तराज गायकवाड चंद्रपूर, जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे यांनी मोर्चेकरी बांधवांना तीव्र शब्दात व देशातील एकंदरीत परिस्थितीबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले आहे.
सदर मोर्चेकरी बांधवांच्या मागण्याचे निवेदन तहसील कार्यातील प्रतिनिधी यांना येऊन निवेदन स्वीकारले आहे तर आक्रोश पणाने काढण्यात आलेल्या मोर्चा यामध्ये ज्वलंत समाजाच्या मागण्या प्रामुख्याने होत्या. परंतु शांततेत मोर्चा यशस्वी काढण्यात आला आहे. यावेळी शेषराव रोडे, राजेंद्र रेड्डी, तुकाराम घंटेवाड, मारुती घोरपडे, चंद्रकांत सूर्यतळ, बाबुराव इंगळे, आनंदा सूर्यतळ, प्रल्हाद भालेराव, नागोराव कमलाकर, नामदेव गायकवाड, प्रकाश ननुरे, संभाजी वाघमारे, हनुमंत घोरपडे, कैलास सूर्यवंशी यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर नायगाव पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.
सदर मोर्चा मध्ये लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्रा.रामचंद्र भरांडे यांनी ईव्हीएम मशीन बंद नाही झाल्यास जागोजागी मशीन फोडण्यात येईल असा तिव्र इशारा यावेळी शासनाला त्यांनी दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा