हजारो भाविकांनी घेतले महाशिवरात्रीनिमित्त दर्शन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा शहराचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर व महादेबांचे मंदिर येथे मराठवाडा च विदर्भातील हजारो भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतले. ८ मार्च रोजी सिंदखेड राजा येथील रामेश्वर मंदिर येथील महादेवाच्या पिंडीचा फार मोठा इतिहास आहे साक्षात प्रभूरामचंद्र श्रीलंकेत सीतामाईचा शोध घेत असताना सिंदखेड राजा येथून जात असताना येथे थांबले होते त्यांनी स्वतःच्या हाताने महादेवाच्या पिंडीची स्थापना केली तेच शहराचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर होय. पूर्वी राजे लखुजीराव जाधव यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता बालशिवबा राजमाता जिजाऊसह येथे दोन वर्षाचे
असताना दर्शनासाठी आले होते. फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे त्यामुळे येथे संपूर्ण दिवसभर प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भावीक भक्ताची रांग लागली होती.
रामेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष
बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. दहा
हजारापेक्षा जास्त लोकांनी महाशिवरात्री
निमित्त रामेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याची
माहिती त्यांनी दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा