हरी भक्ती परायण ज्ञानदेव महाराज वाबळे
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता महिलांमध्ये उपजतच असते. त्यामुळे वारकरी संप्रदायात व मुख्यत्वे गाडगे महाराजांनी महिलांना अग्रस्थान दिले होते असे प्रतिपादन हभप ज्ञानदेव महाराज वाबळे गुरुजी यांनी केले. तालुक्यातील वाघाळा येथे आज दि. ८ मार्च, शुक्रवारी शिवरात्रों व महिला दिनाच्या पर्वावर आयोजित सोहळ्यात समाज प्रबोधनपर हरिकिर्तन प्रसंगी केले, ज्यामध्ये सजीवामध्ये क्रोध नाही, त्याचे नांव शिव. शिव असणारा एकमेव महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. तत्कालीन इतर सर्व राजे हे सत्ता आणि संपत्तीच्या मागे लागलेले आढळून येत असल्याचेही म्हटले. आजकाल वारकरी संप्रदायाचे जे भटाळीकरण करणे सुरु आहे, ते तातडीने थांबवणे गरजेचे असल्याचे, व तसे न झाल्यास समाज वेगळ्याच
हरिकिर्तन प्रसंगी हभप ज्ञानदेव महाराज वाबळे
मार्गाला जाईल व तेथून परतणे कठीण होईल. आजकाल पन्नास हजारापर्यंत रक्कम घेऊन कीर्तन आहेत. मात्र त्या करणारे महाभागही कीर्तनातून समाज प्रबोधन, उद्बोधन होत नाही. म्हणून अशा महाराजांना असेही कथन जनतेनेच दूर ठेवावे, वाबळे गुरुजी यांनी केले, ग्रंथ पाठ असून उपयोग नाही तर वैचारिक व तात्विक बैठक पक्की
असली पाहिजे. मंदिर बांधण्यावर जोर न देता, तरुणांनी एक गाव एक पाणवठा, एक स्मशानभूमी, एकच प्रार्थनास्थळ यापद्धतीने गावगाडा यशस्वी झाला तर ते वारकरी संप्रदायाच्या चळवळीचे श्रेय असेल. बहुजन समाजातील तरुणाई कुणार्यातरी हत्यारे बनून काम करीत आहेत. तर त्याचवेळी दोन टक्क्यावाल्यांची पोरं
जग जिंकत असल्याचे चित्र आहे. यावर युवकांनी चिंतन करण्याचे आवाहन गुरुजींनी केले. सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न उघड दिसतो. तसे झाल्यास गोरगरिबांची मुले मुली शिक्षणापासून वंचित राहणार त्यातून सावित्रीबाई व महात्मा फुले यांचं स्वप्न निधितच भंग पावणार आहे. त्यामुळे बहुजनांनी वेळीच सावध होण्याची गरजही व्यक्त केली. मनुष्य पैशाने नव्हेतर कर्तृत्वाने मोठा होतो ह्या तुकोबारायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी वाघाळा येथे आलो असल्याच्या कळकळयुक्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. बुद्धांनी सांगितलेला सज्जनांचा कळप निर्माण करण्याचे आवाहन ज्ञानदेव महाराज वाबळे यांनी केले. महाशिवरात्रों महोत्सव समिती, वाघाळा यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात हभप योगिताताई देवकर, पैठण व हभप श्री. डॉ. जलाल महाराज सैय्यद, नाशिक यांच्याही समाज प्रबोधनात्मक हरिकिर्तनाचेही आयोजन सोहळ्यात करण्यात आले होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा