शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
लोकसभेच्या निवडणुकीसाठी विविध परवानगीसाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहेत. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विविध परवानगीसाठी तहसील कार्यातील एक खिडकी योजनेत अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे लोकसभेच्यानिवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - ०५ बुलढाणा लोकसभा मतदार संघ २४ सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघएक खिडकी परवाना कक्ष असून उमेदवारांना विविध परवानग्या वाहन परवानगी, ध्वनीक्षेपक परवानगी, सभेच्या ठिकाणाची परवानगी, प्रचार कार्यालय उघडणे
पोस्टर बॅनर ची परवानगी छपाई व मुद्रकांची परवानगी ह्या विविध परवानग्या या स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाकडून मिळणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधींनी विविध परवानगीसाठी एक खिडकी योजनेमध्ये अर्ज देऊन सदर परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहेतया निवडणुकीसाठी काढाव्यालागतात त्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजयखडसे यांनी सिंदखेडराजा तहसीलकार्यालयामध्ये एक खिडकी योजनासुरू केली आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा