maharashtra day, workers day, shivshahi news,

भूईजमध्ये तीन कोटीच्या विकासकामांचे लोकार्पण

भूग्ॠषी मठासाठी एक कोटीचा निधी देणार - मकरंद पाटील 

1 crore fund for Bhugri Matha Give - Makarand Patil , satara ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, वाई जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे
वाई: जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार आणि ग्रामपंचात सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे वार्ड निहाय तीन कोटी रुपयांची विकासकामाचे उदघाटन करुन लोकार्पण करण्यात आली. यावेळी उर्वरित भूग्ऋषी आश्रम (मठ) आणि मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळाच्या तटबंदीसाठी दीड कोटीचा निधि देणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केले. भुईज ता. वाई येथे फुलेनगर येथील पावट्याचा ओढ्यावरील बंधा-यासाठी 28 लाख रुपये, भुईज ओझर्डे रस्त्यावरील भोसलेवस्ती येथील ओढ्यावरील बंधा-यासाठी 30 लाख, यासह अन्य दोन बंधा-यांना 57 लाख रुपये, भूग्ॠषी चौक ते पोलिस ठाणे रस्ता 30 लाख, बदेवाडी येथील दत्तमंदीर सभा मंडप 12 लाख, भिरडाचीवाडी येथील रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, 
भिरडाचीवाडी अंगणवाडी इमारत बांधणी 10 लाख, खालचे चाहूर येथे जाधव वस्ती ते कारखाना रस्ता 4.50 लाख, वरचे चाहूर अंगणवाडी इमारत बांधकाम 11.25 लाख, वरचे चाहूर ओढ्यावरील बंधारा 25 लाख, खालचे चाहूर येथील रस्ता करणे 17 लाख, खालचे चाहुर जांभळी ओढ्यावरील पूल बांधणे 40 लाख, खालचे चाहूर पुढच्या ओढ्यावरील बंधारा बांधकाम 21 लाख यासह स्थानिक कार्यकर्त्याच्या सूचनेवरुन वाढीव कामाचे निर्णय घेत तीन कोट रुपयांचे विकासकामे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान उपसरपंच शुभम पवार यांनी सुचवलेल्या कृष्णानदी काठावरील प्राचीन भृग्ऋषी आश्रम परिसर विकासासाठी एक कोटी व मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ जामा मस्जिदच्या बाजूच्या असणा-या तटबंदीच्या बांधकामासाठी 50 लाख रुपये लवकरच देणार असल्याची ग्वाही देत उपसरपंच शुभम पवार व सदस्यांचे ग्रामपंचायत कामकाजाचे कौतुक केले. 
याही पुढे विकास कामासाठी लागेल एवढा निधी देण्याचा प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिनकाका पाटील, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, पै,प्रकाश पावशे, कारखान्याचे संचालक रामदास इथापे, गजानन भोसले, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, प्रकाश चव्हाण, निवास शिंदे, राजेंद्र सोनावणे, सुधिर गायकवाड, स्थिर भोसले, राजेंद्र भोसले,, विनोद जाधव, सागर भितांडे, भरत भोसले, अमित लोंखडे, निशा भोसले, दिपाली भोसले, पूजा जांभळे,रुपाली खरे कुमार बाबर, विजय इथापे यांच्यासह भुईंज जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !